मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला संत तुकाराम महाराजां विषयी माहिती मराठीत देणार आहे. तसेच मी तुम्हाला Sant tukaram information in marathi याबद्दल पण माहिती देणार आहेत.
मित्रांनो मी तुम्हाला तुकाराम महाराज यांच्या अभंगा विषया वर माहिती देणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Sant tukaram information in marathi.
अनुक्रम
Sant Tukaram Information in Marathi
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” असा अभंग जनसामान्य पोहोचवून ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवणारे संत म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे आहे. त्यांना तुकोबा असेही म्हटले जाते.
संत तुकाराम हे इसवी सन सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंतपंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. यांच्या घराण्यातील विश्र्वंभरबुवा हे मूळ पुरुष विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांना सावजी हा मोठा भाऊ आणि कान्होबा धाकटा भाऊ होता.
वडिलांचे नाव बोलोबा आणि आईचे नाव कनकाई होते. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. तुकारामांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात अनेक दुःख भोगावे लागले.
पंढरपूरचे विठोबा म्हणजेच विठ्ठल हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाची सुरुवात संत तुकाराम यांनीच केली. समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून आणि कीर्तनातून केले. संत तुकाराम हे त्या काळातील लोक संत होते.
बहुजन समाजाला जागृत करून देव धर्माबद्दल त्यांची मते लोकांना पटवून देण्यात ते यशस्वी ठरले. समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचे काम संत तुकारामांनी केले. त्यांचे अभंग मानवी जीवनाला उपकारक ठरले आहेत. संत तुकाराम यांना गरिबान विषयी कळवळा होता.
माणुसकीची त्यांना जाणीव होती. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होता. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग बरोबरच गवळणी ही रचल्या. त्यांच्या अभंगाचा अनेकांनी अभ्यास करून सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
अजून वाचा:
१) Gudi Padwa Information in Marathi | गुढीपाडवा माहिती मराठी
२) माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी | My School Essay In Marathi
३) प्रदूषण वर मराठी निबंध | Pollution Essay In Marathi
Sant Tukaram Information in Marathi – संत तुकारामांचे प्रारंभिक जीवन
त्यांचे घराणे सुखी संपन्न व प्रतिष्ठित असे होते. त्यांच्या मालकीचे पांडुरंग मंदिर असल्याने येथे होणारी कीर्तने भजने मुलाने ऐकून लहान वयातच त्यांच्या बहुश्रुतपणा आलेला होता. वडील बंधू कान्होबा महाराज यांची पत्नी वारल्यानंतर ते विरक्त होऊन तीर्थाटन करण्यास निघून गेले.
त्यामुळे वयाच्या सतराव्या वर्षी व्यवसायासह सर्व प्रपंचाचा भार तुकाराम महाराजांवर पडलं. 1630 ते 31 मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात दुकानाचे दिवाळे निघाले. दारिद्र्य आले पण ते प्रसंगाला घाबरले नाहीत ते देवाला शरण गेले.
विठला आपला पाठीराखा या श्रद्धेने त्यांनी सारे आयुष्य हरिकीर्तन भजन नामस्मरण ध्यानधारणा व दुसऱ्यावर परोपकार करण्यात आलेले. परिसरातील पहाडावर जाऊन वाचन म्हणून चिंतनात ते घडून जाऊ लागले यांच्या अमृतवाणीने सामान्यजन आणि प्रतिष्ठित लोकांचा समाज आकर्षित होऊ लागल्याने त्यांनी आपल्या गोड रसाळ वाणीने समाजातील जातिव्यवस्था व अंधश्रद्धेवर प्रहार केला. गोरगरीब जनतेला बद्दल त्यांना अतिशय प्रेम होते.
संत तुकाराम माहिती मराठीत – अभंग
मित्रांनो तुकाराम महाराजांनी खूप सुंदर अभंग लिहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” पर्यावरणासाठी संदेश देताना तुकाराम महाराज राज म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”. तुकारामांची परोपकारी वूत्ती व भक्तिमार्ग न आवडून काही दुष्ट व्यक्तींनी त्यांचा अतोनात स्थळ केला.
तू ब्राह्मण नसून वाण्याच्या कुळातला तेव्हा तुला गीतेचे तत्त्वज्ञान सांगण्याचा अधिकार नाही. असे म्हणून तुकारामांनी लिहिलेल्या पोथ्या इंद्रायणी नदीत सोडून द्यायला भाग पाडले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुका तुकोबांचे दर्शन घेतले होते. मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंगाने आढळ स्थान मिळवलेले आहे. मराठी काव्यांचे ते एक शाश्वत भूषण आहेत. असे लोक कल्याणाचा मार्ग सांगणारे तुकोबांचे सोळाशे पन्नास साली निर्वाण झाले.
Sant Tukaram Information in Marathi – संत तुकारामांची साहित्यकृती
संत तुकारामांनी अभंग कविता नावाचा मराठी साहित्य प्रकार रचला ज्यामध्ये लोककथांचा अध्यात्मिक विषयांसह संयोग झाला.1632 ते 1650 या काळात त्यांनी ‘तुकाराम गाथा’ ही मराठी भाषेतील रचनांची रचना केली. ‘अभंगगाथा’ म्हणूनही लोकप्रिय असून त्यात सुमारे ४५०० अभंगांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.
FaQ
तुकाराम महाराजांचे गुरु कोण आहेत?
चैतन्य महाप्रभू हे तुकाराम महाराजांचे गुरू होते.
संत तुकारामांचा मृत्यू कुठे झाला?
देहू इथे संत तुकाराम महाराज यांचा मृत्यू झाला.
तुकारामांच्या पत्नीचे काय झाले?
त्यांचे कुटुंब यशस्वी धान्य विक्रेते आणि मराठा समाजातील शेतकरी, स्वभावाने धार्मिक आणि दानशूर, पंढरपूरच्या विठोबाची कुलदैवत पूजा करणारे होते. तुकारामांचे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झाले होते, परंतु १६२९ च्या दुष्काळात त्यांची पत्नी रखुमाबाई आणि एक मुलगा उपासमारीने गमावला.
संत तुकारामांनी काय संदेश दिला?
संत तुकारामांनी दया, क्षमा आणि मन:शांती या गुणांचा लोकांना उपदेश केला. त्यांनी समतेचा संदेशही दिला.
आज का शिकलो:
मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला संत तुकाराम (Sant tukaram information in marathi) यांच्या विषयी माहिती दिली आहे. तसेच मी तुम्हाला तुकाराम महाराज यांच्या अभंगा बद्दल सुद्धा माहिती दिली आहे. संत तुकारामांची साहित्यकृती आणि संत तुकारामांचे प्रारंभिक जीवन या बद्दल सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषया सोबत.